जगाच्या पाठीवर सुमारे तीन हजार भाषा वापरल्या जातात. मराठी भाषा ही इन्दोयुरोपियन कुळातून आली आहे असे म्हटले जाते.

२७ फेब्रुवारी हा दिवस मराठीला जीवन वाहिलेले कवी कुसुमाग्रज (वि .वा . शिरवाडकर ) ह्यांचा वाढदिवस. हा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी भाषादिन ‘ म्हणून साजरा केला जातो. यंदा भाषादिनास १०४ वर्षे पूर्ण होत आहेत.

डिव्हाईन चाईल्ड हायस्कूल मध्ये मराठी दिन १ मार्च २०१६ रोजी हा दिवस साजरा करण्यात आला.

शाळेची सकाळची प्राथना आणि प्रतिज्ञा मराठी मध्ये झाली . ईयत्ता ९ वि च्या विद्यार्थ्यांनी  मराठी दिवसाचे महत्त्व सांगितले आणि शिवाजी माराजांनी अफझलखानाचा वध कसा केला ह्यावर सुंदर असा मराठी पोवाडा सादर केला . अशा प्रकारे मराठी भाषे विषयीचा अभिमान व्यक्त करण्यात आला.